lss-admin

नादब्रम्ह २०१८

संस्थेच्या माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे शनिवार दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नादब्रम्ह’ हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीतावर आधारित असा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. लोकप्रिय गायिका श्रीमती देवकी पंडित, श्री. निरंजन लेले, श्री. मंदार पुराणिक, श्री. यती भागवत, श्री. शिखरनाद कुरेशी व श्री. आदिनाथ पातकर यात भाग घेतील. संस्थेच्या …

नादब्रम्ह २०१८ Read More »

Gymnastics स्पर्धेतील यश – १८ जानेवारी २०१८

 गुरुवार दि. १८ जानेवारी २०१८ रोजी घाटले व्हिलेज, चेंबूर येथे gymnstics स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवसेनेचे युवा नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी आपल्या संस्थेत सराव करत असलेल्या खालील विद्यार्थ्याना सुवर्णपदक देऊन त्यांचे कौतुक केले. कु. मेघ रॉय कु. आकाश धुवाळी कु. सारा पवार कु. अन्विता पटवर्धन

रुचकर, पौष्टिक व चविष्ट चटणी स्पर्धा

सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखेतर्फे मंगळवार दि. १६ जानेवारी २०१८ रोजी ‘चटणी’ स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा स्त्री व पुरुषांसाठी खुली आहे.आपल्याला जर या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर कृपया संघ कार्यालयात २६१४२१२३ वर संपर्क साधावा. 

बँकांच्या बुडीत कर्जाबाबत गुंतवणूकदारांच्या चिंता

रविवार दि. 21 जानेवारी रोजी श्री. उदय तारदाळकर यांचे ‘बँकांच्या बुडीत कर्जाबाबत गुंतवणूकदारांच्या चिंता’ या विषयावर व्याख्यान आहे. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. संस्थेच्या साठ्ये सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 12-30 या वेळात हा कार्यक्रम होईल.

NSDL तर्फे गुंतवणूकदारांसाठी सुविधा

रविवार दि. १४ जानेवारी रोजी NSDL चे श्री. मनोज साठे व त्यांचे सहकारी NSDL गुंतवणूकदारांना काय सुविधा पुरवते याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे प्राचार्य म.द. लिमये स्मृती व्याख्यान अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. गोखले सभागृहात सकाळी 10-30 ते 12-30 या वेळात हा कार्यक्रम होईल.

मॅजेस्टिक गप्पा २०१८ – कार्यक्रम पत्रिका

शुक्रवार दि. ०५ जानेवारी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक विजय कुवळेकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: पत्रकार संजीव लाटकर शनिवार दि. ०६ जानेवारी सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: छाया भोंजाळ रविवार दि. ०७ जानेवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार नीलिमा बोरवणकर सोमवार दि. ०८ जानेवारी विवेकवादावर धर्मसंकट (परिसंवाद) सहभाग: …

मॅजेस्टिक गप्पा २०१८ – कार्यक्रम पत्रिका Read More »

दातांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्रातर्फे दर महिन्यात एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. आधुनिक विज्ञानाचे शोध व त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात. या महिन्यात वैद्यकीय केंद्र खालील कार्यक्रम घेऊन येत आहे:विषय – सांभाळा दातांचे आरोग्यवक्ते – डॉ. मनीष रानडेस्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिरवेळ – रविवार १४ …

दातांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान Read More »

ग. वा. केळकर – शोकसभा

लोकमान्य सेवा संघाचे कार्यकारी मंडळ सदस्य श्री. गजानन केळकर यांस शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी देवाज्ञा झाली. त्या संदर्भात रविवार दि. ०७ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात येत आहे. सभेमध्ये बोलू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले नाव व दूरध्वनी क्रमांक संघ कार्यालयात कार्यालय अधीक्षकांकडे बुधवार दि. ०३ जानेवारी …

ग. वा. केळकर – शोकसभा Read More »

उतार वयातील अल्पोपहार

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्राच्या ‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमांतर्गत ‘उतार वयातील अल्पोपहार’ या विषयावार सौ. नेहा पंडित यांचे व्याखान आयोजित केले आहे. रविवार १७ डिसेंबर,सायंकाळी ५ ते ७ , गोखले सभागृह. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सर्वाना निमंत्रण.

विविध सरकारी गुंतवणूक योजना

रविवार दि. १७ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता श्री. अशोक ढेरे यांचे ‘विविध सरकारी गुंतवणूक योजना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या साठ्ये सभागृहात हे व्याख्यान होईल. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हे व्याख्यान आयोजित केले आहे. सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

पुस्तक प्रकाशन सोहोळा — २२ डिसेंबर २०१७

संस्थेच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयातर्फे शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता गोखले सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहोळा आयोजित करण्यात येत आहे. ‘मनोरंजक गणित प्रश्नांचा खजिना‘ या डॉ. मेधा लिमये यांनी संकलन व भाषांतरित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विवेक पाटकर (उपाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद) यांच्या हस्ते होणार आहे. प्राध्यापक मोहन आपटे ह्या कार्यक्रमास उपस्थित …

पुस्तक प्रकाशन सोहोळा — २२ डिसेंबर २०१७ Read More »

मिसळोत्सव २०१७ – आभारी आहोत.

मिसळोत्सवाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. त्याचबरोबर गर्दीमुळे काही मिसळप्रेमींना मिसळ खाता आली नाही. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळी मिसळोत्सवाचे आयोजन करत असताना जास्तीत जास्त लोकांना मिसळ मिळेल याची आम्ही काळजी घेऊ.

खाद्यजत्रा २०१८

संस्थेतर्फे शनिवार दि. ०३ फेब्रुवारी व रविवार दि. ०४ फेब्रुवारी २०१८ रोजी १९ वी खाद्यजत्रा आयोजित केली जाणार आहे. खाद्य जत्रेत भाग घेण्यासाठीचे प्रवेश अर्ज संघ कचेरीत उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०७ जानेवारी २०१८ आहे. आपल्याला जर ह्या खाद्यजत्रेत भाग घ्यायचा असेल तर कृपया संघ कचेरीत २६१४२१२३ वर संपर्क साधावा.

‘ब्रिज’ प्रशिक्षण केंद्र

‘ब्रिज’ हा धनदांडग्यांचा वेळ घालवण्यासाठी खेळायचा पत्त्यांचा डाव म्हणून ओळखला जातो. या विस्मयकारक खेळाबद्दलचा गैरसमज आपाल्या समाजातील सुशिक्षित लोकांमध्ये पण आहे. काही जण याला एक जुगाराचा खेळ म्हणून देखील शिक्का मारतात. पण प्रत्यक्षात ‘ब्रिज’ हा बुद्धिमत्ता खेळ म्हणजे (mind game) आहे. world mind game federation ने हे ओळखून आपल्या वार्षिक कार्यक्रमात हा खेळ समाविष्ट केला …

‘ब्रिज’ प्रशिक्षण केंद्र Read More »

इ-वेस्ट आणि प्लास्टिक संकलन

नागरिक दक्षता शाखेतर्फे दर रविवारी सकाळी इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि प्लास्टिक संकलन केले जाते. दि. ०६ ऑक्टोबर ते दि. १५ ऑक्टोबर ग्राहक पेठ असल्याने रविवार दि. ०८ व १५ रोजी इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि प्लास्टिक यांचे संकलन होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

धार्मिक पठण स्पर्धा २०१७ – विजेत्यांची नावे

कृष्णाबाई खंबदकोण बालक-पालक मार्गदर्शन केंद्रातर्फे रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी धार्मिक पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे: इयता पहिली व दुसरी – तीन मनाचे श्लोक पहिला क्रमांक — प्रिशा गालवणकरदुसरा क्रमांक — अनुजा म्हापुसकर व आदिती सांगवेकरतिसरा क्रमांक — यशवी नेरलेकरउत्तेजनार्थ — चिन्मय महाले इयता तिसरी व चौथी – सहा मनाचे …

धार्मिक पठण स्पर्धा २०१७ – विजेत्यांची नावे Read More »

SAATH संस्थेस मदत

SAATH (Support & Aid for Thalasaemia Healing)संस्थेच्या संस्थापिका श्रीमती सुजाता रायकर यांनी बुधवार दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी संस्थेस भेट दिली. त्यांच्या संस्थेतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांची महिती त्यांनी उपस्थितांना दिली. SAATH संस्था करत असलेल्या स्तुत्य उपक्रमास प्रोत्साहन म्हणून लोकमान्य सेवा संघातर्फे SAATH संस्थेस रुपये २५,००० ची (रुपये पंचवीस हजार फक्त) देणगी देण्यात आली. संस्थेच्या …

SAATH संस्थेस मदत Read More »

मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती)

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. नामवंत व निष्णात वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन आणि त्याच बरोबर दिलखुलास गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. आधुनिक विज्ञानाचे शोध आणि त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात. श्रोत्यांच्या व सर्व समावेशक सामान्यांच्या ज्ञानात …

मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती) Read More »

गणेशोत्सव 2017

शुक्रवार दि. 25 ऑगस्ट 2017 पासून संस्था 98 वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात 5 राष्ट्रीय पारितोषिके मिळालेला व अष्टपैलू अभिनेत्री ‘रीमा’ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सावली’ हा शास्त्रीय संगीत प्रधान चित्रपट दाखवला जाणार आहे. तसेच ‘रात्र थोडी सोंगे फार’ हे नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे. गणेशोत्सवाची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका बघण्यासाठी येथे क्लिक करावे.

Scroll to Top