Citizen vigilance wing

झाडूने परिसर आणि कीर्तनाने समाज स्वच्छ होतो हा विचार जगाला पटवून देणारे संत गाडगेबाबा तुम्हा सर्वांना ज्ञात असतीलच. स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती, देई आरोग्यास गती. आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता असणे महत्वाचे आहे. आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छतेच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने एक जबाबदार नागरिक या नात्याने आपल्यामुळे परिसर अस्वच्छ होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

जोपर्यंत विहीर, नदी, नाले सुकत नाहीत तोपर्यंत आपल्याला पाण्याची किंमत कळणार नाही. पाण्याशिवाय आयुष्य जगणे अशक्य आहे. त्यामुळे शक्य तितकी पाण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. पाण्याला प्रदूषणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वजण जलप्रदूषण या गंभीर समस्येबाबत ज्ञात आहोत. आणि त्याला जबाबदारही आपणचं आहोत. जलप्रदूषणामुळे डायरिया, जॉंडिस यासारख्या बऱ्याच आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.

जलप्रदूषणाची कारणे तर तुम्हा सर्वांना माहित असतीलचं, त्याची काही नव्याने ओळख करुन द्यावी लागणार नाही. पण जलप्रदुषण ही नैसर्गिक समस्या नसून मानवनिर्मित समस्या आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपण एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रदूषणासारख्या समस्या रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे सजीव सृष्टीला तर फायदा होईलचं. पण निसर्गाचेही नुकसान होणार नाही.

——————————————————————————————————————————————————————————————————————————————–

Citizen vigilance wing was started in year 1961. It attends to civic problems related to cleanliness, public health, pollution, traffic control, transport system, road repairs, hawkers zone etc. It attempts to secure co-operation of residents on one side and municipal staff, state officers and officials of public utility organizations on the other, in solving civic problems.

Scroll to Top