Shri. Sharad Vinayak Sathye Medical Center

Measles Rubella(MR)vaccination

Measles Rubella(MR)vaccination is available at Tilak Mandir every Sunday between 9 am and 10 am. This is a medical wing initiative. Measles Rubella(MR) लसीकरणाची सुविधा टिळक मंदिरामध्ये दर रविवारी सकाळी ९ ते १० या वेळात उपलब्ध आहे. वैद्यकीय शाखेतर्फे हा उपक्रम राबला जातो.

रक्तदान शिबीर

या वर्षी संस्थेच्या वैद्यकीय शाखेने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. महिन्याच्या एका रविवारी शाखेतर्फे सौ. मीनाताई ठाकरे ब्लड बॅंकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल. ह्या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. अभय भावे यांच्या हस्ते रविवार दि. 11 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळी 5 वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात होणार आहे. उद्घाटनानंतर पाहुण्यांचे भाषण, थेट संवाद व प्रश्नोत्तरे …

रक्तदान शिबीर Read More »

दातांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्रातर्फे दर महिन्यात एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. आधुनिक विज्ञानाचे शोध व त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात. या महिन्यात वैद्यकीय केंद्र खालील कार्यक्रम घेऊन येत आहे:विषय – सांभाळा दातांचे आरोग्यवक्ते – डॉ. मनीष रानडेस्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिरवेळ – रविवार १४ …

दातांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान Read More »

उतार वयातील अल्पोपहार

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्राच्या ‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमांतर्गत ‘उतार वयातील अल्पोपहार’ या विषयावार सौ. नेहा पंडित यांचे व्याखान आयोजित केले आहे. रविवार १७ डिसेंबर,सायंकाळी ५ ते ७ , गोखले सभागृह. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सर्वाना निमंत्रण.

मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती)

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. नामवंत व निष्णात वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन आणि त्याच बरोबर दिलखुलास गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. आधुनिक विज्ञानाचे शोध आणि त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात. श्रोत्यांच्या व सर्व समावेशक सामान्यांच्या ज्ञानात …

मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती) Read More »

पित्ताशय – विकार आणि उपचार

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. या महिन्यात आम्ही ‘पित्ताशय – विकार आणि उपचार’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विविध रोगांविषयी माहिती, उपचार, घ्यायची काळजी इ. वर तज्ञ आपले विचार मांडतील. तज्ञ – डॉ. मोहन जोशी, प्रोफेसर ऑफ सर्जरी (लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज)विषय – पित्ताशय (विकार …

पित्ताशय – विकार आणि उपचार Read More »

सर्वश्रेष्ठ दान – रक्तदान

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमांतर्गत आम्ही येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘सौ. मीनाताई ठाकरे ब्लड बॅंक’ यांच्या सहकार्याने एक रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सर्व रक्तदात्यांना डोनर कार्ड मिळतील व पुढील 2 वर्षे रक्तपेढीतून दात्याला व त्याच्या / तिच्या कुटुंबियांना रक्ताचा विनामुल्य पुरवठा केला जाईल. स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिररविवार दि. 13 ऑगस्ट 2017 …

सर्वश्रेष्ठ दान – रक्तदान Read More »

चला वृद्धत्वाला दूर ठेवूयात

लोकमान्य सेवा संघाच्या कै.शरद विनायक साठ्ये वैद्यकीय शाखा आयोजित ‘वृद्धत्व वर्धक आजारावर नियंत्रण’ या विषयावरचे व्याख्यान रविवार दि. २८ मे रोजी झाले. डॉ. भालचंद्र. व. गोखले यांनी किलेशन थेरपी, त्याचे उपयोग, देण्याची पद्धत, प्रचलित अन्जिओप्लास्टी व बायपास सर्जरी या बरोबरची तुलना या विषयी महत्वपूर्ण विवेचन केले. दृक-श्राव्य स्वरुपात हा कार्यक्रम सादर केला गेला. श्रोत्यांच्या अनेक …

चला वृद्धत्वाला दूर ठेवूयात Read More »

लहान मुलांतील लठ्ठपणा

गोंडस, गुबगुबीत बाळ सगळ्यांना आकर्षित करतात. पण ही गोंडस बाळ जेंव्हा लठ्ठ ह्या प्रकारात येऊ लागतात, तेंव्हा तो चिंतेचा विषय होतो. बालवयातील लठ्ठपणा (child obesity) ही २१व्या शतकातील एक मोठी समस्या आहे. आर्थिक सुबत्ता, साधनांची उपलब्धता, व्यायामाचा आभाव, मैदानी खेळांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लहान वयात लठ्ठपणा दिसून येतो. हा एक आजार असून त्याच्यावर वेळेतच …

लहान मुलांतील लठ्ठपणा Read More »

Scroll to Top