Krishnabai Limaye Gymnasium

                                  || सुदृढ शरीर हाच खरा दागिना  ||

  आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे खरोखरच दुर्लक्ष करत चाललो आहोत. आपण सर्वांनीच या धावपळीच्या जीवनातून आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. सर्वांनीच नियमित व्यायाम केला पाहिजे. दररोज दिवसातून किमान एक तरी फळ खाल्ले पाहिजे. आपण स्वतःच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपले शरीर सुदृढ होण्यास मदत होईल. कारण आपले शरीर जर सुदृढ असेल तरच आपण सुखी जीवन जगू शकू आणि आपली स्वप्न, इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकू.

लोकमान्य टिळक यांचे चरित्र वाचताना एक गोष्ट माझ्या मनावर विशेष ठसली. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षी त्यांनी शरीर सुदृढ करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याचे ठरविले. तसा निश्चयपूर्वक प्रयत्न केला व सुदृढ शरीरसौष्ठव मिळवले. या सुदृढ शरीराचा उपयोग त्यांना त्यांच्या भावी काळात खूप झाला.

सुदृढ शरीराचे महत्व पुराणकाळापासूनच मान्य केले गेले आहे. त्या काळी माणूस हा सतत निसर्गाच्या सहवासात होता. यंत्रांचा शोध लागलेला नसल्यामुळे तो स्वावलंबी होता, कष्टार्जित असे त्याचे जीवन होते. गुरुगृही राहणाऱ्या शिष्यांना नित्य कष्ट करावे लागत. महाभारतकाळात दंड, जोडी, कुस्ती, गदायुद्ध हे प्रकार होते. रामायणकाळातील मारुती ही पराक्रमाची, शरीरसुदृढतेची प्रतीक अशी देवता होती. बलोपासना हीच मारुतीची उपासना. समर्थ रामदासांनी तरुणांना याच शक्ती उपासनेचा मार्ग दाखविला. रामदास सांगतात-

“शक्तीने पावती सुखे | शक्ती नसता विटंबना ||
शक्तीने नेटका प्राणी | वैभव भोगता दिसे ||”

शरीर सुदृढ नसेल; तर व्यक्तीच्या विदवत्तेचा व ज्ञानाचा त्याला किंवा समाजाला काही उपयोग होत नाही. गोपाळ णेश आगरकर यांना तरुण वयापासून दम्याचा विकार होता. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. माधवराव पेशवे यांना उत्तम आरोग्य लाभले असते, तर कदाचित पेशवाईचा इतिहास बदलला असता. विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी प्राप्त करणाऱ्या आनंदीबाई जोशी किंवा तरुण वयात गणितात चमत्कार घडवणारे रामानुजन यांना उत्तम आरोग्य लाभले असते, तर ते भारताचे भाग्यविधाते ठरले असते.

शरीरसंपत्ती ही धनसंपत्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण धनसंपत्ती पुनःपुन्हा संपादन करता येते, पण शारीरिक संपदा ढासळली तर परत मिळवणे फार जिकिरीचे. म्हणून व्यायामाची आवड लहानपणापासूनच लागायला हवी. ‘शरीरम आद्यं खलु धर्मसाधनम’ हे सुभाषित सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. शरीररूपी संपत्ती आपली आपल्यालाच मिळवावी लागते आणि प्राप्त केलेली ही संपत्ती प्रयत्नाने टिकवावी लागते.

————————————————————————————————————————————————————————————————-

Krishnabai Limaye Gymnasium was started in year 1928.

Remembering that Lokmanya Tilak emphasized the need to take care of health which he demonstrated in his life by forgoing one year of his post –matriculation period for improving health, LSSP is focused on Gymnasium as one of the most important aspects of its activities from its early formation.

Children’s Section (for age group 6 to 14)

Provides training in mass drill physical exercises, yogasanas, mallkhamb, gymnastics, martial arts, etc. through daily evening sessions of two hour duration on its playground of over 5,000 sq.ft. called ‘Swatantryaveer Savarkar Ground’.
Professional instructors are appointed to prepare students for competitions in various gymnastic activities. Students of this wing have been regularly winning awards/ medals in competitions both at the State and National levels.

Makarand Ghanekar Adult Section:

It comprises 1600 sq.ft. hall with air conditioning facility and modern equipment/tools for exercise as also special coach to provide scientific guidance and support. The facility is open both for men and women with suitable timings.

Yoga classes for Adults :

Timing :

Fees :

Scroll to Top