“निबंध स्पर्धा “

निबंध स्पर्धा

लोकमान्य सेवा संघ, पारले ही संस्था गेल्या नऊ दशकांपासून कार्यरत आहे. याप्रमाणेच अशा अनेक सामाजिक संस्था देशात आणि परदेशातही विविध क्षेत्रात काम करीत आहेत.  प्रबोधन, विचार आणि कृती या कार्यपद्धतीचा अवलंब करून समाजाच्या विचारसरणीत विकास घडवून आणणे तसेच गरजूंना यथायोग्य साहाय्य करणे हे या सामाजिक संस्थाचे उद्देश असतात.

अतिशय वेगवान आणि झपाट्याने बदलणाऱ्या आजच्या समाजात या संस्थांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. या संस्थांमध्ये असणारा तरुणांचा सहभाग, कदाचित कालबाह्य वाटणारे संस्थांचे उपक्रम आणि मुळातच सामाजिक कामांकडे असणारा ओढा ह्यामध्ये परिवर्तन झाले आहे. अशावेळी सामाजिक संस्थानीच आपल्या कामांचे सिंहावलोकन करावे, आपल्या विविध उपक्रमांचे आत्मपरीक्षण करून त्यांचा सारासार विचार करावा या उद्देश्याने लोकमान्य सेवा संघ, पारले एका निबंध स्पर्धेचे आयोजन करीत आहे.
स्पर्धेचा विषय आहे :
आजच्या काळात सामाजिक संस्थांची आवश्यकता आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा
स्पर्धेचे नियम :
•वरील विषयावर निबंध लिहून तो संस्थेच्या कार्यालयात शनिवार दिनांक 2६ जून २०१८ पर्यंत द्यावा.
•निबंधासाठी शब्दसंख्येचे  बंधन नाही. निबंध मराठी, इंग्लिश किंवा हिंदी भाषेत असावा.
•हस्तलिखित निबंध पानाच्या एकाच बाजूला लिहावेत.
•आपण आपले निबंध पुढील पत्त्यावर ई-मेलने पाठवू शकता.  ई-मेल ने पाठविलेले निबंध केवळ PDF फाईलच्या स्वरूपातच असावेत.  निबंध पाठविण्याकरिता ई-मेल : info@lssparle.org.in
•ई –मेल पाठवताना निबंध स्पर्धा असा विषय लिहावा.
•प्रत्येक स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, पत्ता, ई-मेल  आणि दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी लिहिणे आवश्यक आहे.
•कार्यालयात निबंध आणून देण्याकरिता पुढील पत्ता आणि कार्यालयीन वेळेची नोंद घ्यावी. लोकमान्य सेवा संघ पारले, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७
मंगळवार ते शनिवार  सकाळी ९.३० ते १२ आणि संध्या ५ ते ६.३० वाजेपर्यंत.
•हस्तलिखित निबंध बंद लिफाफ्यात घालून द्यावेत.
•सर्व निबंधांचे तज्ञांकडून परीक्षण केले जाईल.  तज्ञांचा निर्णय हा अंतिम असेल. पहिल्या तीन विजेत्यांना रुपये ५,०००, ३,००० आणि २,००० अशी पारितोषिके धनादेशाद्वारे दिली जातील. सहा महिन्यांच्या आत हा निर्णय घेतला जाईल.
•स्पर्धकांनी निबंधात आपण काम करीत असलेल्या संस्थेची माहिती लिहू नये. स्पर्धकांचे विचार योग्य वाटल्यास ते कार्यपद्धतीत अवलंबिण्याचे अधिकार लोकमान्य सेवा संघाचे असतील. स्पर्धकाला त्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जाणार नाही.
•स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
•कोणतेही निबंध स्पर्धकांना परत पाठविले जाणार नाहीत.
•स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार लोकमान्य सेवा संघाकडे असतील.

संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ, पारले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top