प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

संस्थेच्या नागरिक दक्षता शाखेने प्लास्टिक पिशव्यांच्या सर्रास वापराविरोधात मोहीम आखली आहे. मंगळवार दिनांक ४ एप्रिल पासून पार्लेकरांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासंबंधी आवाहन केले जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून व मोहिमेचा एक भाग म्हणून शुक्रवार दिनाक १४ एप्रिल रोजी सायंकाळी पार्ल्यातील फळे व भाजी विकेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता बाबासाहेब गावडे हॉस्पिटलच्या बाहेर महात्मा गांधी रोडवर संपन्न होणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण व आपले सहकारी यांची उपस्थिती मोलाची ठरेल. तरी या समाजकार्यात आपण सहकार्य करावे ही विनंती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top