बालवयातील लठ्ठपणा (child obesity) ही २१व्या शतकातील एक मोठी समस्या आहे. आर्थिक सुबत्ता, साधनांची उपलब्धता, व्यायामाचा आभाव, मैदानी खेळांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लहान वयात लठ्ठपणा दिसून येतो. हा एक आजार असून त्याच्यावर वेळेतच उपाय करणे गरजेचे आहे. या लठ्ठपणाचा मोठेपणीही मुलांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो.
जनरल फिजिशियन आणि निष्णात आहारतज्ञ डॉ. अनुजा वैद्य आपल्याला ह्या समस्येवर अधिक माहिती सांगणार आहेत. जीवनशैलीतील बदल आणि योग्य आहार नियोजन ह्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पालकांनी आणि शिक्षकांनी ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे.
स्थळ – गोखले सभागृह, लोकमान्य सेवा संघ, टिळक मंदिर वेळ – शनिवार दि. २२ एप्रिल २०१७, संध्याकाळी ५ ते ७
अधिक माहितीसाठी ०२२ २६११७१९५ वर संपर्क साधा.
संघाच्या कु. कृष्णाबाई खंबदकोण बालक-पालक मार्गदर्शन केंद्र आणि कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्र यांनी संयुक्तपणे ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.