Seetabai Ganesh Pethe Stri Shakha

स्थापना – १९२५
Established- 1925
शाखेची उद्दिष्टे- सुरवातीला पारले परिसरातील स्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, रोजगार निर्मिती करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे तसेच रुढी, परंपरा व संस्कृती ची जोपासना आणि संवर्धन ही प्रमुख उद्दिष्टे होती. त्यानंतर बदलत्या सामाजिक परिस्थिती नुसार ह्यात बदल होत गेला. आता स्रियांना त्यांच्या हक्कांची, स्री विषयक कायदे याची जाणीव करुन देणे तसेच बदलत्या सामाजिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करणे. वैचारिक प्रगल्भता व अंगभूत गुणवत्ता यांच्या विकासासाठी कार्य करणे. रुढी आणि परंपरेला आधुनिक स्वरूप देण्यासाठी मार्गदर्शन करणे. समाजातील विविध क्षेत्रात, अडचणीं वर मात करुन यश संपादन करणाऱ्या महिलांची ओळख समाजाला करुन देणे. स्रियांच्या सार्वांगीण विकासाला हातभार लावणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

Women’s Wing was established to address different issues faced by them around 95 years ago. Making them financially independent and skill development was the main goal. Celebrating traditional festivals and bringing them together to share their experiences was expected. As per changes in social framework, and the role of women in it, Stree Shakha has undertaken different programs for women empowerment and education about their rights and laws related to different issues faced by a woman at all levels. Felicitation and Taking Interviews of women who have achieved success or doing exemplary work in different areas and showcasing their talent to inspire others is also one of the principal goals of Stree Shakha.

शाखेचे उपक्रम-
दैनंदिन – काही नाही
साप्ताहिक- दर शुक्रवारी दुपारी ४-५:३०
पहिल्या शुक्रवारी स्री शाखा समिती ची सभा
दुसऱ्या शुक्रवारी- ‘ मनोगत’ अंतर्गत विविध विषयांवर चर्चा. महिलांना आपली मते मांडण्याची संधी.
तिसऱ्या व चौथ्या शुक्रवारी -प्रवास वर्णन, पुस्तक परिक्षण, कथाकथन, महत्त्वाच्या घडमोडीवर स्फुट वाचन, खेळ, इ. गोष्टी घेतल्या जातात.
वार्षिक- १) आठ मार्च जागतिक महिला दिन – विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान व मुलाखत
२) वसंतोत्सव- संगीत, साहित्य, नाट्य, चित्रपट इ.क्षेत्रातील कलावंतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम.
३) जिवतीची कहाणी- वंचित, मागास अथवा अदिवासी महिला व मुले यांच्यासाठी निरलसपणे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अथवा कार्यकर्ती यांचा सन्मान करणे. कार्याची ओळख करुन घेणे व मदतीचा हात पुढे करणे.
४) गणेशोत्सव- स्रीशाखे च्या सदस्य एकत्र येऊन कार्यक्रम सादर करतात उदाहरणार्थ महाभारतातील स्रिया, पेशवेकालीन स्रियांचे मनोगत. इतर संस्था ना आमंत्रित करुनही नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर केले जातात. उदा. १०१व्या गणेशोत्सवात ‘स्नेह’ पुणे यांनी सादर केलेला ‘आमची कविता’ हा स्रीमनाचे व भावभावनांचे असंख्य पदर उलगडून दाखवणारा कार्यक्रम.
५) महालक्ष्मी स्थापना- नवरात्रात अष्टमीला पारंपरिक पद्धतीने दोन सत्रात हा उत्सव साजरा होतो. सकाळी सुवासिनी देवीची पंचामृती पूजा करतात व सायंकाळी मूर्ती ची स्थापना व पूजा होते. रात्री पर्यंत भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. त्या वेळी भजन, जोगवा गायन तसेच घागरी फुंकणे, फुगड्या घालणे असे महिला उत्साहाने करतात.
६) भोंडला- स्री जीवनाचा आरसा असणारी गीते गात, फेर धरुन पारंपरिक पद्धतीनने भोंडला खेळला जातो. सर्व वयोगटातील मुली व बायका आनंदाने यात सहभागी होतात. खिरापत ओळखणे ह्या मजेशीर गोष्टी ने सांगता होते.
७) संतांची मांदियाळी- श्री ज्ञानेश्वर संजीवन समाधीच्या निमित्ताने, श्री. ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. भजन स्पर्धा, अभंग गायन, किर्तन, संतसाहित्या वरचे प्रवचन, लेखन स्पर्धा या पैकी एक कार्यक्रम आयोजित केला जातो.
८) संक्रांत – तिळगुळ समारंभ व त्याच बरोबर प्रश्न मंजुषा अथवा नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गायन, वादन अथवा नृत्यअविष्कार चे आयोजन केले जाते.
९) रमी व पाककृती स्पर्धा – खेळीमेळीच्या वातावरणात करमणूक म्हणून आयोजित ह्या स्पर्धां ना उत्तम प्रतिसाद मिळतो.
Programs :-
Daily-
Weekly – Every Friday 4-5:30 pm
First Friday is kept for meeting of committee members.
Second Friday in ‘Manogat’ , Participating ladies are expected to express their opinions about various social events or issues.
Remaining Fridays, there is discussion or book reviews, or reading of newspaper articles or travelog is done. Sometimes some sports are also conducted.
Yearly Following programs on different occasions are organised with lot of enthusiasm and planning
1) International woman’s Day- Felicitation of a woman who has achieved exemplary feat in her area of profession such as police, journalist, social worker, writer etc.
2) Vasantosav – celebration of Spring festival by dance, music
3) Jeev tichi Kahani- Felicitation and interview of a social worker who has done selfless work for poor, destitute or tribal women and children esp in the area of health and education.
4) Ganapati Festival- The members of Stri Shakha perform on certain topics Such as life of women in Mahabharat or During Reign of Peshwa s etc Sometime we invite other institute to give cultural program. For example in 101 st Ganapati Festival of Lokmanya Seva Sangh. We invited ‘Sneha’ Pune to perform on women centric poetry.
5) Mahalaxmi – During Navratri festival, on eighth day , a special Pooja is organised and idol of Devi is eracted with traditional rituals. Many devotees visit to offer prayers to Goddess Mahalaxmi.
6) Bhondla – It’s a traditional, Maharashtrian dance performed on folk songs. Women and girls of all ages participate enthusiastically. It is organised on one of the day during Navratri . Sometimes a talk on various aspects of women’s life esp in ancient and medivial India is organised on this occasion.
7) Santanchi Mandiyali- On the occasion of anniversary of Self Realisation ( Samadhi) of Saint Dyneshwar of Varkari tradition , a program of devotional songs or Speech is organised with the co operation of Shri Dyneshwari Abhyaas Mandal, Parle.
8) Makar Sankranti -a Tilgul festival is organised with enjoyable games or the young artist performance is organised to showcase their talent.
9) Competion of Rami ( cards game) and Cooking is organised to have some fun filled moments for women.

नैमित्तिक कार्यक्रम – काही महत्त्वाच्या घडामोडी अथवा प्रसिद्ध साहित्यिक वा कलावंत यांची जयंती अथवा पुण्यतिथी या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. त्रिवार तलाक विरोधात आलेल्या कायद्या बद्दल श्रीमती. बागेश्री परिख ( निवृत्त न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय) यांचे व्याख्यान. ग्राहकपेठ शाखा आयोजित ‘ग्राहकपेठ’ मधे स्टॉल घेतला. स्रीशाखेची व संस्थेची माहिती लोकांना दिली व त्याचबरोबर आदिवासी महिलांच्या उत्पादनाची विक्री होण्यास हातभार लावला.

Occasional Program- Special programs are organised on the occasion of birth or death anniversary of renowned artists or writers as well as during extraordinary events or government announcement s such as Law debarring Tripal Talak etc.
We at Stri Shakha, took a stall during ‘Grahak Peth’ organised in LSS premises, for two days. We explained the activities done by parent organisation as well as that of Stri Shakha to the visitors. We also helped the tribal women to sell their products on our stall.

संपर्का साठी माहिती- स्रीशाखे विषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्याशी जरुर संपर्क करावा.
राधा पेठे ( स्री शाखा, कार्यवाह ) -9322248092
वसुधा गोरे ( स्री शाखा ,कार्यवाह)-9833260855
E mail :- vasudha_gore@yahoo.Com
निमा नवलकर ( स्री शाखा, अध्यक्ष)- 9820452138

भविष्यातील उपक्रम- १) १० वर्ष चालत असलेला पण काही कारणास्तव बंद पडलेला कायदा कक्ष पुन्हा सुरु करणे
२) स्री आरोग्य, व्यक्तिमत्व विकास , संभाषणकला, हस्ताक्षरावरुन स्वभाव परिक्षण, कायदेविषयक कार्यशाळांचे आयोजन करणे
३) आदिवासी मुलींचे रोजगाराच्या संधी मिळण्याच्या दृष्टिने शिबीर आयोजित करणे. उदा. मेहंदी काढणे, बांबूच्या वस्तू बनवणे.
Futur endeavors-
*1) to restart the ‘Kayda Kasha’ I.e. to start the free councelling about Women centric laws to needy. To conduct workshops of the same.
2) To conduct small workshops about health, personality development, To find someone s natur from ones handwriting / signature , communication skill development etc.
3) To conduct residencial skill development program for tribal girls and women such as Heena, Bamboo art etc.

• विशेष लक्षवेधी माहिती*- गेली अनेक वर्षे स्री शाखेच्या सभासद विविध स्पर्धां मधे भाग घेत आहेत तसेच यश संपादन करत आहेत. कुलाबा महिला विकास मंडळाच्या आंतर महिलामंडळ वक्तृत्व स्पर्धेत सलग दोन वर्षे ( २०१८, २०१९) , स्री शाखेने प्रथम क्रमांकाची ढाल पटकावली आहे.
• Special Information – Stri Shakha members have been participating in various competition s organised all over Mumbai. Last two years (2018, 2019) Stri Shakha has won the First Prize Trophy in Mumbai level elocution competition organised by Mulana Mahila Vikas Mandal, Mumbai.

देणगी चे स्वरुप – भविष्यातील उपक्रमामधे नमूद केल्याप्रमाणे, स्री शाखेला खूप काम करायचे आहे त्यासाठी लोकांचे सहकार्य मिळावे ही विनंती आहे. दोन स्वरूपात तुम्ही आम्हाला मदत करू शकता.
१) आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास, कायदा याविषयीचे तुमचे ज्ञान आम्हाला उपयुक्त ठरेल.
२) आर्थिक सहाय्य अथवा एखाद्या कार्यशाळेला स्पोन्सर करणे.
Appeal For Donation – Stri Shakha would like to conduct various workshops mentioned above. We seek your help to make them successful. You can help us in two ways
1) Share your knowledge and expertise in the field of health, fitness, personality development and law with us
2) Monetary help or sponsor a workshop.

Please note that programs of Stri Shakha are free and open to all except Rami competition.

Your participation is a Booster Dose for us

राधा पेठे / वसुधा गोरे निमा नवलकर
कार्यवाह। अध्यक्ष
( सीताबाई गणेश पेठे स्री शाखा)

———————————————————————————————————————————————————————————————————————————-

Scroll to Top