लोकमान्य सेवा संघाची आनंदधाम (ज्येष्ठ नागरिक सहनिवास) ही शाखा सुधागड तालुक्यात, खोपोली पाली रस्त्यावर गेल्या तेवीस वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत आहे.आनंदधाम बाहेरील (रेस्ट इन फॉरेस्ट ते गणपती मंदिर असा) सुमारे ४५० मीटर्सचा रस्ता हा कच्चा असल्यामुळे ज्येष्ठ मंडळींना गावात फिरण्यासाठी, देवळांमध्ये वा दुकानात जाण्यासाठी थोडी अडचण येत होती.(टिळक मंदिराचे जुने जाणते आणि निरलस कार्यकर्ते श्री यशवंत जोशी यांनी पुढाकार घेऊन, स्वखर्चाने हा रस्ता करवून घेतला.)हा रस्त्याचे डांबरीकरण झाल्यावर महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ८ मार्च २०२१ रोजी जांभूळपाडा येथील महिला सरपंच सौ. श्रद्धा कानडे, लोकमान्य सेवा संघाच्या सौ. संगिता साने आणि आनंदधाम निवासी आणि कार्यवाह श्रीमती सुमनताई लोंढे यांच्यासह तेथील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या रस्त्याचे औपचारीक उदघाटन केले. माजी सरपंच श्री गणेश कानडे, स्थानिक महनीय श्री रविंद्र खंडागळे आणि श्री जे बी पाटील सर हेही आवर्जून उपस्थित होते.आनंदधाम निवासी आणि गावामधील स्थानिकांनी श्री यशवंत जोशी आणि लोकमान्य सेवा संघाला ही अत्यावश्यक सोय केल्याबद्दल खूप धन्यवाद दिले.