शतकपूर्ती सोहोळा २०२३ – खासदार श्रीमती पूनम महाजन.
शतकपूर्ती सोहोळा २०२३.
खासदार श्रीमती पूनम महाजन.यांचा सत्कार.
लोकमान्य सेवा संघ, पारले ,
टिळक मंदिर – स्थापना ११ मार्च १९२३.
शतकपूर्ती सोहोळा २०२३.
खासदार श्रीमती पूनम महाजन.यांचा सत्कार.
लोकमान्य सेवा संघ, पारले ,
टिळक मंदिर – स्थापना ११ मार्च १९२३.
शतकपूर्ती सोहोळा २०२३ – गुढीपाडवा.
मा. उप-मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन.
शतकपूर्ती सोहोळा कार्यक्रम – श्री. आशिष चौहान,
M.D. & C.E.O. National Stock Exchange.
श्री. आशिष चौहान ह्यांनी Technology Evolution in Indian stock Market 1975 to 2023 ह्या विषयावर उपस्थितांना विस्तृतपणे माहिती दिली.
शतकपूर्ती सोहोळा 2023 – आरंभ.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष श्री. विनय सहस्रबुद्धे आणि आमदार श्री. पराग अळवणी ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शतकपूर्ती सोहोळयाच्या कार्यक्रमास आरंभ झाला.
शतकपूर्ती सोहोळयात श्री. गंगाराम, यांचा संस्थेचा एक विश्वासू आणि कामसू व्यक्ति म्हणून सत्कार करण्यात आला.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी १०० व्या गणेशोत्सवात लोकमान्य सेवा संघास भेट दिली.
श्री. मोदी गोखले संभागृहतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना.
संस्थेतर्फे स्थानिक खासदार श्रीमती पूनम महाजन यांचा जाहीर सत्कार शनिवार दि. ०१ जून २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता संस्थेच्या स्वा. सावरकर पटांगणावर आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्नेहलता देशमुख असतील. तसेच श्री. पराग अळवणी, श्री. मुकुंद चितळे, श्री. सुनील मोने, श्री. मृगांक परांजपे व श्री. मिलिंद करमरकर हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित असतील. श्रीमती पूनम …
डॉ. कलबाग अपंग पुनर्वसन केंद्राचा वार्षिकोत्सव मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता पु. ल. देशपांडे सभागृहामध्ये साजरा होणार आहे. केंद्रातील गतिमंद मुले वार्षिकोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. मुलांचे कौतुक करण्यासाठी आपण सर्वानी या कार्यक्रमास यावे ही आग्रहाची विनंती.
लोकमान्य सेवा संघाची आनंदधाम (ज्येष्ठ नागरिक सहनिवास) ही शाखा सुधागड तालुक्यात, खोपोली पाली रस्त्यावर गेल्या तेवीस वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत आहे.आनंदधाम बाहेरील (रेस्ट इन फॉरेस्ट ते गणपती मंदिर असा) सुमारे ४५० मीटर्सचा रस्ता हा कच्चा असल्यामुळे ज्येष्ठ मंडळींना गावात फिरण्यासाठी, देवळांमध्ये वा दुकानात जाण्यासाठी थोडी अडचण येत होती.(टिळक मंदिराचे जुने जाणते आणि निरलस कार्यकर्ते श्री यशवंत …
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेतर्फे ‘पुलकित’ हा कार्यक्रम शनिवार दि. ३० मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता पु. ल. देशपांडे सभागृहात आयोजित केला आहे. श्रीमती माधुरी नाईक, श्रीमती साक्षी देशपांडे आणि दिलासा केंद्राचे सभासद हा कार्यक्रम सादर करतील. सर्वांना हार्दिक आमंत्रण
संस्थेतर्फे दरवर्षी ‘समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ आणि ‘कवी मोरेश्वर पटवर्धन काव्यपुरस्कार’ असे दोन पुरस्कार दिले जातात. तसेच दर दोन वर्षांतून एकदा ‘गुरुवर्य मा. सी. पेंढारकर ग्रंथपुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कारांसाठी सुयोग्य व्यक्ती/संस्था आणि पुस्तके निवडण्याचे काम संस्थेच्या ग्रंथालय शाखेवर सोपवण्यात आले होते. निराधार मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या ‘एकता निराधार संघ’ या संस्थेची यावर्षीच्या आगरकर …
लोकमान्य सेवा संघाचे १९२३ ते १९४२ या कालावधीतील १९ वार्षिक वृत्तान्त आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा. इतर वर्षांचे वार्षिक वृत्तान्त लवकरच संकेतस्थळावर अपलोड केले जातील.
संस्थेने शनिवार दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्ज download करण्यासाठी येथे क्लिक करा.
संस्थेतर्फे ‘आजच्या काळात सामाजिक संस्थांची आवश्यकता आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात १९ जणांनी भाग घेतला. महाड, बदलापूर, सावंतवाडी, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई अशा विविध ठिकाणांहून स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. त्यातील पारितोषिक विजेत्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे: प्रथम पारितोषिक – श्री. किशोर वालावलकर, सावंतवाडी द्वितीय पारितोषिक – श्री. …
संघाच्या विविध कामांसाठी आम्हांस पूर्णवेळ पर्यवेक्षक पाहिजे आहे. संस्थेच्या इमारतींची देखभाल व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार ही त्याची प्राथमिक जबाबदारी असेल. तसेच त्या अनुषंगाने येणारे कार्यालयीन काम त्यास करावे लागेल. त्यासाठी कम्प्युटरची माहिती असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग अथवा सिव्हिल कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. इच्छूक व्यक्तींनी आपला अर्ज संघ कार्यालयात शनिवार दि. ०१ सप्टेंबर …