संस्थेच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ३.३० वाजता पु.ल. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
सभेपुढील कामे:
- पु. ल. फौंडेशन ही विश्वस्त संस्था लोकमान्य सेवा संघात १९९९ साली विलीन झाली. त्यावेळी पु. ल. फौंडेशनकडे असलेले पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे सर्व स्वामित्वहक्क संघाकडे आलेले आहेत. २०१८-१९ हे पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संघाकडे असलेले पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे सर्व स्वामित्वहक्क लोकार्पण करण्यास मान्यता देणे.
- लोकमान्य सेवा संघाच्या लोकमान्य निवास या इमारतीत ६ भाडेकरू राहतात. ते साधारणत: २,८०० चौरस फूट जागा वापरत आहेत. संघाला जागेची अत्यंत आवश्यकता आहे. तरी योग्य ती भरपाई देऊन त्या जागा संघाच्या ताब्यामध्ये घेण्यास मान्यता देणे. भरपाईसाठी जास्तीत जास्त रुपये ४ कोटी खर्च करण्यास मान्यता देणे.
संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ, पारले