संस्थेतर्फे दरवर्षी ‘समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ आणि ‘कवी मोरेश्वर पटवर्धन काव्यपुरस्कार’ असे दोन पुरस्कार दिले जातात. तसेच दर दोन वर्षांतून एकदा ‘गुरुवर्य मा. सी. पेंढारकर ग्रंथपुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कारांसाठी सुयोग्य व्यक्ती/संस्था आणि पुस्तके निवडण्याचे काम संस्थेच्या ग्रंथालय शाखेवर सोपवण्यात आले होते.
निराधार मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या ‘एकता निराधार संघ’ या संस्थेची यावर्षीच्या आगरकर पुरस्कारासाठी तसेच ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहासाठी श्री. अमूल पंडित यांची पटवर्धन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कै. मधुकर केशव ढवळीकर यांना ‘भारताची कुळकथा’ या पुस्तकासाठी पेंढारकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच श्री. वा. फाटक ग्रंथालयातर्फे बालविभाग व प्रौढविभाग यांमधून दोन सभासदांना सर्वोत्तम वाचक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कारप्रदान समारंभ शनिवार दिनांक २३ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५.३० ते ८:०० या वेळेत संस्थेच्या गोखले सभागृहात होईल. मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती.