लोकमान्य सेवा संघाची ९६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ०९ जून २०१९ रोजी दुपारी ३.३० वाजता संस्थेच्या पु. ल. देशपांडे सभागृहात भरणार आहे. सभेत पुढील कामे होतील:
- रविवार दि. १७ जून २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.
- रविवार दि. ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.
- कार्यकारी मंडळाने सादर केलेल्या ०१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षाचा वार्षिक वृत्तान्त संमत करणे.
- कार्यकारी मंडळाने सादर केलेले हिशेब व हिशेब तपासनिसांनी तपासलेल्या ०१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षाच्या हिशेबास मान्यता देणे.सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणाऱ्या हिशेबाची प्रत वाचण्यास येथे क्लिक करावे.
- ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या वर्षाचा अर्थ संकल्प संमत करणे.
- संघ नियम क्रमांक १८(२) (ज) प्रमाणे पुढील वर्षाकरिता सनदी हिशेब तपासनीस नेमणे व त्यांचे मानवेतन ठरवणे.
- संघ नियम क्रमांक १८(२) (झ) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता कायद्याचे सल्लागार नेमणे.
- संघ नियम क्रमांक १३ (२) (अ) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता संघाच्या दोन संयुक्त कार्यवाहांची निवड करणे. (निवडणूक नियमावलीप्रमाणे)
- संघ नियम क्रमांक १३ (२) (ब) प्रमाणे पुढील तीन वर्षांकरता कार्यकारी मंडळावरील बारा सभासदांची निवड करणे. (निवडणूक नियमावलीप्रमाणे)
- अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय
सभेची पूर्ण नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.
संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ, पारले