लोकमान्य सेवा संघ, पारले यांची 95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 17 जून 2018 रोजी दुपारी 3-30 वाजता संस्थेच्या पु.ल. देशपांडे सभागृहात भरणार आहे. सभेत पुढील कामे होतील:
- 11/06/2017 रोजी झालेल्या 94 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.
- कार्यकारी मंडळाने सादर केलेल्या 01 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 यावर्षाचा वार्षिक वृतान्त संमत करणे.
- कार्यकारी मंडळाने सादर केलेले हिशेब व हिशेब तपासनिसांनी तपासलेले 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 यावर्षाचे हिशेबास मान्यता देणे.
- 01 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या वर्षाचा अर्थ संकल्प संमत करणे.
- संघ नियम क्रमांक 18(2) (ज) प्रमाणे पुढील वर्षाकरिता सनदी हिशेब तपासनीस नेमणे व त्यांचे मानधन ठरवणे.
- घटना नियम क्रमांक १२ (३) (थ) मध्ये योग्य तो बदल करण्याविषयी निर्णय घेणे.
- अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय.
मनोज निरगुडकर / यशवंत जोशी
संघ कार्यवाह
लोकमान्य सेवा संघ, पारले
विशेष सूचना
- सर्वसाधारण सभेची गणसंख्या 25 राहील. योग्य गणसंख्येने सुरु झालेली सभा, सभेचे कामकाज चालू असता, गणसंख्या नसली तरी स्थगित होणार नाही. सभेच्या नियुक्त वेळेपासून पंधरा मिनिटांच्या आत गणसंख्या पूर्ण झाली नाही तर सभा स्थगित केली जाईल. अशा तऱ्हेने स्थगित झालेली सभा त्याच ठिकाणी पंधरा मिनिटांनतर भरेल. अशा स्थगित सभेस गणसंख्येचा नियम लागू नाही. (संघ नियम 18(9) अन्वये)
- वार्षिक हिशेब व वृत्तान्ताची प्रत दि. 10 जून 2018 पासून संघ कार्यालयात (कार्यालयीन वेळेत) पहाण्यासाठी उपलब्ध होईल. (संघ नियम 18(7) अन्वये)
- सभासदांनी सभेपुढील कामाबद्दल सूचना, सूचक –अनुमोदक यांच्या संमतीसह 10 जून 2018 पर्यंत संघकार्यवाहांकडे पाठविल्या पाहिजेत. (संघ नियम 18(6) अन्वये)
मताधिकार (संघ नियम 19 क)
- ज्या सभासदास सभासद होऊन सहा महिने पूर्ण झाले असतील अशा सभासदांसच मतदानाचा अधिकार राहील.
- संघाच्या कर्मचाऱ्यास, तो संघाचा सभासद असला तरी मतदानाचा अधिकार असणार नाही.
- मतदानाचा अधिकार नसलेल्या सभासदास सभेस उपस्थित रहाता येईल. परंतू कोणत्याही प्रकारे सभेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही.