सी.म.जोशी दिलासा केन्द्रानी दि.१४.६.२०१८ रोजी नाडकर्णी बाल कल्याण केन्द्रात”हास्य कल्लोळ”हा बहारदार कार्यक्रम सादर केला.
ज्येष्ठ दिलासा सभासदांना एक हलक्या फुलक्या ,खुसखुशीत कार्यक्रमाची मेजवानी मिळाली.हास्यातून आनंद निर्मिती करायची हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
“लाफ्टर क्लब”ची संकल्पना घेऊन सर्व सभासदांनी वेगवेगळे “लाफिंग थेरपीचे प्रकार केले.सर्व सभासद खळखळून हसले.
विनोद,विडंबन गीते,दैनंदिन जीवनातील विनोदी किस्से,मालवणी भाषेतील मधाळ विनोद,हादग्याचे विनोदी गीत व स्वरचीत विनोदी वाक्यांबरोबरच श्री.द.मा.मिरासदार,मंगेश पाडगांवकर व पु.ल.यांनी लिहिलेल्या विनोदी साहित्यातील काही भागांचे सादरीकरण दिलासा कलाकारांनी उत्कृष्ट रित्या केले.
“हास्य” मनाच्या ताणावरील उत्तम उपाय आहे.कित्येक तासांचा ताण क्षणभराच्या हसण्याने दूर होतो.खळखळून हसणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.हास्यानी चेहऱ्यावर प्रसन्नता येऊन निखळ आनंद मिळतो.हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे.
ह्या कार्यक्रमाद्वारे सूत्रधार श्रीमती मानसी आपटे यांनी सर्व सभासदांना हास्य कल्लोळात डुंबवून काढले.
“आनंदाचे डोही आनंद तरंग”