Month: March 2019

आनंदधाम येथे रस्त्याचे काम

लोकमान्य सेवा संघाची आनंदधाम (ज्येष्ठ नागरिक सहनिवास) ही शाखा सुधागड तालुक्यात, खोपोली पाली रस्त्यावर गेल्या तेवीस वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत आहे.आनंदधाम बाहेरील (रेस्ट इन फॉरेस्ट ते गणपती मंदिर असा) सुमारे ४५० मीटर्सचा रस्ता हा कच्चा असल्यामुळे ज्येष्ठ मंडळींना गावात फिरण्यासाठी, देवळांमध्ये वा दुकानात जाण्यासाठी थोडी अडचण येत होती.(टिळक मंदिराचे जुने जाणते आणि निरलस कार्यकर्ते श्री यशवंत …

आनंदधाम येथे रस्त्याचे काम Read More »

पुलकित – अपरिचित आणि परिचित पुल

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेतर्फे ‘पुलकित’ हा कार्यक्रम शनिवार दि. ३० मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता पु. ल. देशपांडे सभागृहात आयोजित केला आहे. श्रीमती माधुरी नाईक, श्रीमती साक्षी देशपांडे आणि दिलासा केंद्राचे सभासद हा कार्यक्रम सादर करतील. सर्वांना हार्दिक आमंत्रण

पुलोत्सव – धावता आढावा

संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे पुलोत्सव साजरा केला जातो. त्याचा धावता आढावा बघण्यासाठी येथे क्लिक करा. संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती नीला रवींद्र यांनी खूप मेहनत घेऊन हा व्हिडियो तयार केला आहे. त्यांचे विशेष आभार. youtube वर प्रकाशित होणारा संस्थेचा हा पहिला व्हिडियो आहे.

पुरस्कार वितरण समारंभ २०१९

संस्थेतर्फे दरवर्षी ‘समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ आणि ‘कवी मोरेश्वर पटवर्धन काव्यपुरस्कार’ असे दोन पुरस्कार दिले जातात. तसेच दर दोन वर्षांतून एकदा ‘गुरुवर्य मा. सी. पेंढारकर ग्रंथपुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कारांसाठी सुयोग्य व्यक्ती/संस्था आणि पुस्तके निवडण्याचे काम संस्थेच्या ग्रंथालय शाखेवर सोपवण्यात आले होते. निराधार मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या ‘एकता निराधार संघ’ या संस्थेची यावर्षीच्या आगरकर …

पुरस्कार वितरण समारंभ २०१९ Read More »

रमी स्पर्धा २०१९

सीताबाई गणेश पेठे स्री शाखेतर्फे १९ मार्च रोजी रमी स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३०एक स्पर्धक उत्साहाने ३-३० वाजता हजर झाल्या .स्पर्धेचे नियम समजून घेऊन सर्वजणी हसत खेळत रमी खेळण्यात दंग झाल्या .हळूहळू स्पर्धेला रंग चढत गेला .७ वाजता स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला: श्रीमती वैशाली जोग श्रीमती आशाताई जोशी श्रीमती दीपा पेठे श्रीमती …

रमी स्पर्धा २०१९ Read More »

आजी आजोबांचा पालकत्वातील सहभाग

रविवार दि. १७ मार्च २०१९ रोजी बालक पालक केंद्राने ‘आजी आजोबांचा पालकत्वातील सहभाग’ या विषयावर व्याख्यान आयोजित .केले होते. त्यावेळी डॉ. सुजाता फडके यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला.

हल्ली मुले ऐकतात का? — वय वर्षे ८ ते १२ मुलांशी संवाद

‘हल्ली मुले ऐकतात का?’ दहापैकी नऊ पालकांच्या तोंडातून दिवसातून दहा वेळा येणारे हे वाक्य !कसे बोलायचे?, कुणी बोलायचे?, कधी बोलायचे? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काय बोलायचे? — हा सगळ्यात मोठा पेच प्रसंग पालकांसमोर, शिक्षकांसमोर आणि मुलांशी संपर्कात असलेल्या सर्वांसमोर असतो.वय वर्षे ८ ते १२ वयोगटातील मुले ऐकून न ऐकल्यासारखे करणे, उलट उत्तरे देणे अशा विविध …

हल्ली मुले ऐकतात का? — वय वर्षे ८ ते १२ मुलांशी संवाद Read More »

Scroll to Top