Month: May 2018

95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा – सभासदांना सूचना

लोकमान्य सेवा संघ, पारले यांची 95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 17 जून 2018 रोजी दुपारी 3-30 वाजता संस्थेच्या पु.ल. देशपांडे सभागृहात भरणार आहे. सभेत पुढील कामे होतील: 11/06/2017 रोजी झालेल्या 94 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे. कार्यकारी मंडळाने सादर केलेल्या 01 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 यावर्षाचा वार्षिक वृतान्त …

95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा – सभासदांना सूचना Read More »

” श्रद्धांजली”

लोकमान्य सेवा संघाचे ज्येष्ठ  कार्यकर्ते श्री.गोविंद जोग यांना शनिवारी दिनांक १९ मे २०१८ रोजी देवाज्ञा झाली.संस्थेच्या गोखले सभागृहात शनिवार दि.२६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शोकसभा आयोजित करण्यात येत आहे.मनोज निरगुडकर/यशवंत जोशीसंघ कार्यवाह,लोकमान्य सेवा संघ.

“निबंध स्पर्धा “

निबंध स्पर्धा लोकमान्य सेवा संघ, पारले ही संस्था गेल्या नऊ दशकांपासून कार्यरत आहे. याप्रमाणेच अशा अनेक सामाजिक संस्था देशात आणि परदेशातही विविध क्षेत्रात काम करीत आहेत.  प्रबोधन, विचार आणि कृती या कार्यपद्धतीचा अवलंब करून समाजाच्या विचारसरणीत विकास घडवून आणणे तसेच गरजूंना यथायोग्य साहाय्य करणे हे या सामाजिक संस्थाचे उद्देश असतात. अतिशय वेगवान आणि झपाट्याने बदलणाऱ्या …

“निबंध स्पर्धा “ Read More »

“सलाम !सैनिका !!”

दिनांक १० मे २०१८ रोजी शहीद दिनानिमित्त “सलाम! सैनिका!! ” हा दृक् श्राव्य कार्यक्रम सायंकाळी ५वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात साजरा झाला.आपली तिन्ही सेनादलं, बदलत्या काळानुसार अद्यावत तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री कशी हाताळतात, तसेच उत्तम प्रशिक्षण घेतलेले व शारिरीक आणि मानसिकरित्या सक्षम सैनिक प्रत्यक्षात युद्ध भूमीवर सदैव कसे जागरूक असतात. सीमा परिसरात सतत होणाऱ्या छोट्या मोठ्या चकमकी …

“सलाम !सैनिका !!” Read More »

ग्राहक पेठ २०१८ – वेळापत्रक

संस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे. ग्राहक पेठेतील गाळ्यांसाठीचे अर्ज ०१ जून २०१८ पासून संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. तसेच या संकेतस्थळावरही उपलब्ध होतील. इच्छुकांनी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधून गाळ्यासाठीचे अर्च्ज घ्यावेत. ०१ जुलै २०१८ हा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा …

ग्राहक पेठ २०१८ – वेळापत्रक Read More »

Scroll to Top