Month: December 2017

ग. वा. केळकर – शोकसभा

लोकमान्य सेवा संघाचे कार्यकारी मंडळ सदस्य श्री. गजानन केळकर यांस शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी देवाज्ञा झाली. त्या संदर्भात रविवार दि. ०७ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात येत आहे. सभेमध्ये बोलू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले नाव व दूरध्वनी क्रमांक संघ कार्यालयात कार्यालय अधीक्षकांकडे बुधवार दि. ०३ जानेवारी …

ग. वा. केळकर – शोकसभा Read More »

उतार वयातील अल्पोपहार

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्राच्या ‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमांतर्गत ‘उतार वयातील अल्पोपहार’ या विषयावार सौ. नेहा पंडित यांचे व्याखान आयोजित केले आहे. रविवार १७ डिसेंबर,सायंकाळी ५ ते ७ , गोखले सभागृह. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सर्वाना निमंत्रण.

विविध सरकारी गुंतवणूक योजना

रविवार दि. १७ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता श्री. अशोक ढेरे यांचे ‘विविध सरकारी गुंतवणूक योजना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या साठ्ये सभागृहात हे व्याख्यान होईल. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हे व्याख्यान आयोजित केले आहे. सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

पुस्तक प्रकाशन सोहोळा — २२ डिसेंबर २०१७

संस्थेच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयातर्फे शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता गोखले सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहोळा आयोजित करण्यात येत आहे. ‘मनोरंजक गणित प्रश्नांचा खजिना‘ या डॉ. मेधा लिमये यांनी संकलन व भाषांतरित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विवेक पाटकर (उपाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद) यांच्या हस्ते होणार आहे. प्राध्यापक मोहन आपटे ह्या कार्यक्रमास उपस्थित …

पुस्तक प्रकाशन सोहोळा — २२ डिसेंबर २०१७ Read More »

मिसळोत्सव २०१७ – आभारी आहोत.

मिसळोत्सवाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. त्याचबरोबर गर्दीमुळे काही मिसळप्रेमींना मिसळ खाता आली नाही. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळी मिसळोत्सवाचे आयोजन करत असताना जास्तीत जास्त लोकांना मिसळ मिळेल याची आम्ही काळजी घेऊ.

खाद्यजत्रा २०१८

संस्थेतर्फे शनिवार दि. ०३ फेब्रुवारी व रविवार दि. ०४ फेब्रुवारी २०१८ रोजी १९ वी खाद्यजत्रा आयोजित केली जाणार आहे. खाद्य जत्रेत भाग घेण्यासाठीचे प्रवेश अर्ज संघ कचेरीत उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०७ जानेवारी २०१८ आहे. आपल्याला जर ह्या खाद्यजत्रेत भाग घ्यायचा असेल तर कृपया संघ कचेरीत २६१४२१२३ वर संपर्क साधावा.

Scroll to Top