Month: August 2017

धार्मिक पठण स्पर्धा २०१७ – विजेत्यांची नावे

कृष्णाबाई खंबदकोण बालक-पालक मार्गदर्शन केंद्रातर्फे रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी धार्मिक पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे: इयता पहिली व दुसरी – तीन मनाचे श्लोक पहिला क्रमांक — प्रिशा गालवणकरदुसरा क्रमांक — अनुजा म्हापुसकर व आदिती सांगवेकरतिसरा क्रमांक — यशवी नेरलेकरउत्तेजनार्थ — चिन्मय महाले इयता तिसरी व चौथी – सहा मनाचे …

धार्मिक पठण स्पर्धा २०१७ – विजेत्यांची नावे Read More »

SAATH संस्थेस मदत

SAATH (Support & Aid for Thalasaemia Healing)संस्थेच्या संस्थापिका श्रीमती सुजाता रायकर यांनी बुधवार दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी संस्थेस भेट दिली. त्यांच्या संस्थेतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांची महिती त्यांनी उपस्थितांना दिली. SAATH संस्था करत असलेल्या स्तुत्य उपक्रमास प्रोत्साहन म्हणून लोकमान्य सेवा संघातर्फे SAATH संस्थेस रुपये २५,००० ची (रुपये पंचवीस हजार फक्त) देणगी देण्यात आली. संस्थेच्या …

SAATH संस्थेस मदत Read More »

मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती)

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. नामवंत व निष्णात वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन आणि त्याच बरोबर दिलखुलास गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. आधुनिक विज्ञानाचे शोध आणि त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात. श्रोत्यांच्या व सर्व समावेशक सामान्यांच्या ज्ञानात …

मधुमेहावर नियंत्रण (विना-औषध उपचार पद्धती) Read More »

गणेशोत्सव 2017

शुक्रवार दि. 25 ऑगस्ट 2017 पासून संस्था 98 वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात 5 राष्ट्रीय पारितोषिके मिळालेला व अष्टपैलू अभिनेत्री ‘रीमा’ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सावली’ हा शास्त्रीय संगीत प्रधान चित्रपट दाखवला जाणार आहे. तसेच ‘रात्र थोडी सोंगे फार’ हे नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे. गणेशोत्सवाची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका बघण्यासाठी येथे क्लिक करावे.

दहीहंडी २०१७

कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतील मुले सकाळी मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता दहीहंडी साजरी करणार आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यायला आणि त्यांचे कौतुक करायला आपण सर्वांनी यावे ही विनंती. स्थळ – स्वा. सावरकर पटांगण, टिळक मंदिर. वेळ – मंगळवार दि. 15 ऑगस्ट सकाळी 9 वाजता.

स्वातंत्र्यदिन समारंभ २०१७

मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल. संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे समारंभाचे अध्यक्ष असतील. स्थळ – पु. ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिरवेळ – मंगळवार दि. 15 ऑगस्ट सकाळी 8 वाजता.कृपया सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.

पित्ताशय – विकार आणि उपचार

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. या महिन्यात आम्ही ‘पित्ताशय – विकार आणि उपचार’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विविध रोगांविषयी माहिती, उपचार, घ्यायची काळजी इ. वर तज्ञ आपले विचार मांडतील. तज्ञ – डॉ. मोहन जोशी, प्रोफेसर ऑफ सर्जरी (लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज)विषय – पित्ताशय (विकार …

पित्ताशय – विकार आणि उपचार Read More »

सर्वश्रेष्ठ दान – रक्तदान

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमांतर्गत आम्ही येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘सौ. मीनाताई ठाकरे ब्लड बॅंक’ यांच्या सहकार्याने एक रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सर्व रक्तदात्यांना डोनर कार्ड मिळतील व पुढील 2 वर्षे रक्तपेढीतून दात्याला व त्याच्या / तिच्या कुटुंबियांना रक्ताचा विनामुल्य पुरवठा केला जाईल. स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिररविवार दि. 13 ऑगस्ट 2017 …

सर्वश्रेष्ठ दान – रक्तदान Read More »

Scroll to Top